बंजारा नाका कामगार संघटनेच्या जनजागृती अभियानाला प्रतिसाद
मुंबई -प्रतिनिधी
देशातील तमाम भटकेविमुक्त, आदिवासी आणि ओबीसी समाजाचे नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी मुंबईतील नाका कामगारांकडून ठिकठिकाणी अभिवादन करण्यात आले. आपल्या समस्यांच्या मुख्य आधार असलेल्या आपल्या लाडक्या नेत्याला सकाळी नऊ वाजता त्यांचो छायाचित्र असलेल्या पत्रकाचे वाटप करून हे अभिवादन करण्यात आले. बंजारा नाका कामगार संघटनेकडून राज्यभरात सुरु करण्यात आलेल्या राज्यव्यापी जनजागृती अभियानांतर्गत फोर्ट परिसरात असलेल्या बजार गेटच्या पारसी मंदीर नाक्यावर सकाळी मुंडे यांना नाका, बांधकाम कामगारांकडून अभिवादन करण्यात आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष ॲड् नरेश राठोड, स्व.नारायणदादा आडे बहुउद्देशीय संस्था, शिळोणाचे प्रमुख व बंजारा नाका कामगार संघटनेचे प्रचारक प्रकाश आडे, संत सेवालाल फाऊंडेशनचे गोविंद राठोड, चंद्रा पवार, संतोष राठोड आदी उपस्थित होते.
गोपीनाथ मुंडे यांनी संत सेवालाल महाराज यांचे समाधीस्थळ असलेल्या वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी या तीर्थक्षेत्राचा विकास करण्याचे स्वप्न पाहिले होेते ते आता त्यांच्या सरकारने पूर्ण करावे आणि राज्यात असलेल्या असंघटीत क्षेत्रातील नाका व बांधकाम कामगारांच्या विकासासाठी राष्ट्रसंत संत सेवालाल महाराज यांच्या नावाने नाका व असंघटीत कामगारांचे स्वतंत्र कामगार महामंडळ स्थापन करावे ही प्रमुख मागणी संघटनेचे प्रमुख ॲड. राठोड यांनी केली.
संघटनेकडून मागील १ डिसेंबरपासून राज्यात जनजागृती अभियान राबवण्यात येत असून संघटनेचे प्रेरणास्थान असलेल्या गोपीनाथ मुंडे यांना फोर्ट परिसरातील फोर्ट नाका, चना स्ट्रीट नाका, वाशीनाका आदी अनेक ठिकाणी नाक्या-नाक्यांवर नाका कामगारांकडून अभिवादन करण्यात आले. फोर्ट नाका येथे प्रकाश आडे यांच्यासोबतच अर्जून जाधव, सुभाष आडे, भिमराव राठोड, भिका जाधव, भगवान ढोपावकर, समाधान कर्वेकर आदी उपस्थित होते. यावेळी संत सेवालाल महाराज आणि गोपीनाथ मुंडे यांच्या नावांचा जयघोष करण्यात आला.
***********************
बंजारा नाका कामगारांकडून बाजार गेट येथे असलेल्या फोर्ट नाक्यावर ओबीसीचे नेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले यावेळी संघटनेचे प्रमुख ॲड. नरेश राठोड, प्रकाश आडे आदी दिसत आहेत.
16 people like this.
Comments
Sanjeevkumar Kamble
Write a comment...