शनिवार, १९ डिसेंबर, २०१५

पोहरागड श्रद्धास्थानाला

पोहरागड श्रद्धास्थानाला जोडणा-या बससेवेसाठी परिवहन मंत्र्यांकडे मागणी

(5 Oct) मुंबई, ५ ऑक्टोबर (हिं.स.) : देशातील भटक्या विमुक्त जमातींचे श्रद्धास्थान असलेल्या वाशिम इथल्या राष्ट्रसंत सेवालाल महाराजांच्या समाधीस्थानी जाण्यासाठी थेट बससेवा नसल्याने त्यासाठी परिसरात बस स्थानकाच्या उभारणीसहित त्वरीत थेट व कायमस्वरूपी बससेवा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी बंजारा नाका कामगार संघटनेच्या (मुंबई) वतीने करण्यात आली आहे. देशातील सात कोटींच्या दरम्यान असलेल्या भटक्या विमुक्त जाती जमातींचे सर्वात मोठे श्रद्धास्थान वाशिम जिल्ह्याच्या मनोरा तालुक्यातील पोहरागड येथे आहे. रामनवमीला या ठिकाणी तब्बल पाच ते सहा लाख श्रद्धाळू देशातल्या वेगवेगळ्या ठिकाणांहून येत असतात. आंध्रप्रदेश, कर्नाटक, मध्यप्रदेश, गोवा यांसारख्या राज्यांतून येणा-या श्रद्धाळूंना राज्य परिवहनची थेट बससेवा उपलब्ध नसल्याने खासगी वाहनांनी प्रवास करावा लागतो. पोहरागडच्या बाजूला उंबरीगड येथे जेतालाल महाराज यांची समाधी आहे. तसेच इतरही काही श्रद्धास्थाने आहेत. त्यामुळे तिथे रोज शेकडो श्रद्धाळूंची ये-जा असते. त्यामुळे या परिसरात या श्रद्धास्थानांना जोडणा-या व परराज्यात जाणा-या बससेवेची नितांत गरज आहे. मागील

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा