शनिवार, १९ डिसेंबर, २०१५

नाका कामगारांकडून गोपीनाथ मुंडे यांना अनोखे अभिवादन

नाका कामगारांकडून गोपीनाथ मुंडे यांना अनोखे अभिवादन

https://www.mahabjp.org/Batamya/PressRelease.aspx



 | 

गोपीनाथ मुंडे यांना बंजारा नाका कामगारांचे अनोखे अभिवादन

 देशातील तमाम भटकेविमुक्त, आदिवासी आणि ओबीसी समाजाचे लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी मुंबईतील नाका कामगारांकडून ठिकठिकाणी अभिवादन करण्यात आले.
naka kamgarमुंबई - देशातील तमाम भटकेविमुक्त, आदिवासी आणि ओबीसी समाजाचे लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी मुंबईतील नाका कामगारांकडून ठिकठिकाणी अभिवादन करण्यात आले. सकाळी नऊ वाजता गोपीनाथ मुंडे, संत सेवालाल महाराज आदी महापुरुषांचे छायाचित्र असलेल्या पत्रकांचे वाटप करून हे अभिवादन करण्यात आले.
बंजारा नाका कामगार संघटनेकडून राज्यभरात सुरू करण्यात आलेल्या राज्यव्यापी जनजागृती अभियानांतर्गत फोर्ट परिसरात असलेल्या बजार गेटच्या पारसी मंदिर नाक्यावर सकाळी मुंडे यांना नाका, बांधकाम कामगारांकडून अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या वेळी संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. नरेश राठोड, नारायणदादा आडे बहुउद्देशीय संस्थेचे प्रमुख व बंजारा नाका कामगार संघटनेचे प्रचारक प्रकाश आडे, संत सेवालाल फाऊंडेशनचे गोविंद राठोड, चंद्रा पवार, संतोष राठोड आदी उपस्थित होते.
या वेळी गोपीनाथ मुंडे यांनी संत सेवालाल महाराज यांचे समाधीस्थळ असलेल्या वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी या तीर्थक्षेत्राचा विकास करण्याचे स्वप्न पाहिले होते ते आता या सरकारने पूर्ण करावे आणि राज्यात असलेल्या असंघटित क्षेत्रातील नाका व बांधकाम कामगारांच्या विकासासाठी राष्ट्रसंत संत सेवालाल महाराज यांच्या नावाने नाका व असंघटित कामगारांचे स्वतंत्र कामगार महामंडळ स्थापन करावे, ही प्रमुख मागणी संघटनेचे प्रमुख अ‍ॅड्. राठोड यांनी केली. संघटनेकडून मागील १ डिसेंबरपासून राज्यात जनजागृती अभियान राबवण्यात येत असून संघटनेचे प्रेरणास्थान असलेल्या गोपीनाथ मुंडे यांना फोर्ट परिसरातील फोर्ट नाका, चना स्ट्रीट नाका, वाशीनाका आदी अनेक ठिकाणच्या नाक्या-नाक्यांवर गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना नाका कामगारांकडून अभिवादन करण्यात आले. फोर्ट नाका येथे प्रकाश आडे यांच्यासोबतच अर्जुन जाधव, सुभाष आडे, भीमराव राठोड, भीका जाधव, भगवान ढोपावकर, समाधान कर्वेकर आदी उपस्थित होते. या वेळी संत सेवालाल महाराज आणि गोपीनाथ मुंडे यांच्या नावांचा जयघोष करण्यात आला.
Print Friendly
Tags:  |  |  | 

Share It



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा