शनिवार, १९ डिसेंबर, २०१५

"पोहरादेवी (पोहरागड)" पर्यटन

http://epaper.eprahaar.in/detail.php?cords=242,1586,1234,2248&id=story10&pageno=http://epaper.eprahaar.in/28112015/Mumbai/Page5.jpg


आमदार रामनाथ मोते यांची शासनाकडे मागणी 
मुंबई (प्रतिनिधी)

 देशातील सुमारे ७ कोटीच्या दरम्यान असलेल्या भटक्या विमुक्त जाती जमातीचे सर्वात मोठे श्रद्धास्थान व पवित्र तीर्थक्षेत्र असलेल्या पोहरादेवी (पोहरागड) पर्यटन स्थळ म्हणून घोषित करण्याची मागणी शिक्षक आमदार रामनाथ मोते यांनी शासनाकडे केली असल्याचे शिक्षक परिषदेचे अनिल बोरनारे यांनी सांगितले.
याबाबत आमदार रामनाथ मोते यांनी मंत्रालयात राज्यमंत्री व वाशीम जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ रणजीत पाटील यांना भेटून हि मागणी केली आहे.
वाशीम जिल्ह्याच्या मानोरा तालुक्यातील पोहरागड येथे रामनवमीच्या दिवशी फार मोठा उत्सव साजरा होतो तसेच राष्ट्रसंत सेवालाल महाराज यांच्या प्रसिद्ध समाधी स्थळाच्या दर्शनासाठी दरवर्षी 15 ते 20 लाख भक्तगण व पर्यटक येत असतात. पोहरागड  हे निसर्गाने सुशोभित असे तीर्थक्षेत्र असून या स्थळाचा पर्यटन म्हणून विकास होणे आवश्यक आहे.

या तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी यापूर्वीच्या शासनाने अनेकवेळा घोषणा करूनही कोणत्याही प्रकारची अंमलबजावणी केली नाही. या ठिकाणी आंध्रप्रदेश, कर्नाटक, मध्यप्रदेश, गोवा आदी राज्यातून येणार्या भक्तगणासाठी परिवहन, पाणी, भक्तनिवास, पथदिवे इत्यादीबाबत तातडीने कृती कार्यक्रम घेणे आवश्यक आहे.
दिवंगत लोकनेते गोपीनाथजी मुंडे यांचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी तातडीने मंत्रालयात बैठक आयोजित करावी अशी मागणी आमदार रामनाथ मोते यांनी शासनाकडे केली असल्याचे शिक्षक परिषदेचे अनिल बोरनारे यांनी सांगितले. 

वाशिमच्या पोहरगड तीर्थस्थानी राज्य परिवहन मंडळाच्या बसेसचा तुटवडा 

admin-ajax.php
पर्यटनाच्या दृष्टीने उत्तम ठिकाण, भाविकांची आर्थिक लूट
मुंबई / प्रतिनिधी :
देशभरातील सात कोटी भटक्या विमुक्त जाती जमातींचे श्रद्धास्थान असलेल्या वाशिमच्या मनोरा तालुक्यातील पोहरागड हे तीर्थक्षेत्र आणि राष्ट्रसंत सेवालाल महाराज यांचे प्रसिद्ध समाधीस्थळ आहे. दरवर्षी या ठिकाणी विविध राज्यातून 5 ते 6 लाख भाविक येत असतात. निसर्ग सौदर्यांने नटलेल्या या पर्यटन स्थळापासून चांगले उत्पन्न मिळू शकते. मात्र, याठिकाणी आपल्या राज्य परिवहन मंडळाच्या बसेसचा तुटवडा असल्याने तेथून मिळणारे सारे उत्पन्न खासगी बसांना मिळते. तसेच येथे दर्शनासाठी येणाऱया भाविकांनाही त्रास सहन करावा लागतो.
पोहरागड येथे आंध्रप्रदेश, कर्नाटक, मध्यप्रदेश, गोवा आदी राज्यातून भाविक येतात. या सर्व भाविकांना राज्य परिवहन मंडळाच्या बसेसचा तुटवडा असल्यामुळे खासगी बसने प्रवास करावा लागतो. इतर राज्यांप्रमाणेच मुंबई, नवी मुंबई, ठाणे या भागांतूनही पोहरागडला जाणाऱयांची संख्या मोठी आहे. मात्र, या पर्यटनस्थळापासून मिळणाऱया महसूलापासून राज्य परिवहन मंडळ वंचित राहत आहे. या मार्गावर राज्य परिवहन मंडळाने नियमित बस सेवा सुरू केल्यास भाविकांची सोय होऊन राज्य परिवहन मंडळालाही त्याचा फायदा होऊ शकतो.
 पोहरागडच्या बाजूला उंबरीगड येथे जेतालाल महाराज यांची समाधी आहे. त्याच परिसरात सवाईराम महाराज, प्रल्हाद महाराज, सामकी माता आदींचे देवस्थान असून, तेथे शेकडो भक्त येत असतात. या मार्गावरही नियमित बस सेवा असल्यामुळे भाविकांची आर्थिक लूट होते. तसेच येथून अनेक भाविक माहुरगड येथील रेणुका माताच्या दर्शनासाठीही जातात. त्यामुळे राज्य परिवहन मंडळाने या तीर्थक्षेत्रांना जोडणाऱया बससेवा, बसस्थानक आणि राज्य, परराज्यांतील भाविकांसाठी सुरू कराव्यात अशी मागणी भाविकांकडून होत आहे. राज्य सरकारने या भागाचा विकास करावा. तसेच त्यासाठी निधी राखून ठेवावा, याचा विचार होणे आवश्यक आहे.

Related posts:

पोहरागड श्रद्धास्थानाला

पोहरागड श्रद्धास्थानाला जोडणा-या बससेवेसाठी परिवहन मंत्र्यांकडे मागणी

(5 Oct) मुंबई, ५ ऑक्टोबर (हिं.स.) : देशातील भटक्या विमुक्त जमातींचे श्रद्धास्थान असलेल्या वाशिम इथल्या राष्ट्रसंत सेवालाल महाराजांच्या समाधीस्थानी जाण्यासाठी थेट बससेवा नसल्याने त्यासाठी परिसरात बस स्थानकाच्या उभारणीसहित त्वरीत थेट व कायमस्वरूपी बससेवा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी बंजारा नाका कामगार संघटनेच्या (मुंबई) वतीने करण्यात आली आहे. देशातील सात कोटींच्या दरम्यान असलेल्या भटक्या विमुक्त जाती जमातींचे सर्वात मोठे श्रद्धास्थान वाशिम जिल्ह्याच्या मनोरा तालुक्यातील पोहरागड येथे आहे. रामनवमीला या ठिकाणी तब्बल पाच ते सहा लाख श्रद्धाळू देशातल्या वेगवेगळ्या ठिकाणांहून येत असतात. आंध्रप्रदेश, कर्नाटक, मध्यप्रदेश, गोवा यांसारख्या राज्यांतून येणा-या श्रद्धाळूंना राज्य परिवहनची थेट बससेवा उपलब्ध नसल्याने खासगी वाहनांनी प्रवास करावा लागतो. पोहरागडच्या बाजूला उंबरीगड येथे जेतालाल महाराज यांची समाधी आहे. तसेच इतरही काही श्रद्धास्थाने आहेत. त्यामुळे तिथे रोज शेकडो श्रद्धाळूंची ये-जा असते. त्यामुळे या परिसरात या श्रद्धास्थानांना जोडणा-या व परराज्यात जाणा-या बससेवेची नितांत गरज आहे. मागील
- उद्याच्या बैठकीत निर्णय, माथाडींच्या धर्तीवर सवलतीची मागणी
जमीर काझी। दि. ३ (मुंबई)
वितभर पोटासाठी घरादारपासून दूर हजारो किलोमीटर जावून राबणार्‍या राज्यातील असंघटीत, अशिक्षित ३0 लाखांच्यावर असलेल्या कामगारांसाठी एक खुशखबर आहे. त्यांच्या सर्वागिण विकासासाठी राज्य सरकारला उशिरा का होईना जाग आलेली असून त्यांच्या प्रश्नाबाबत चर्चा करण्यासाठी येत्या मंगळवारी कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी संबंधिताची बैठक बोलाविलेली आहे. नाका, दगडखाण, वीटभट्टी,ऊस तोडणी मजुरांची नोंदणी करुन माथाडी कामगाराप्रमाणे स्वतंत्रपणे महामंडळ स्थापन करण्याबाबत प्रामुख्याने निर्णय घेतला जाणार आहे.
या असंघटित कामगारांपैकी १५ लाखजण मुंबई, ठाणे व पुण्यातील चारशे नाक्यावर रोज रोटीसाठी थांबलेले असतात, बहुतांशजण बांधकामाच्या ठिकाणी तर मुबंईत ससून डॉक, भाऊचा धक्का बंदरावर मजूरी करीत आहेत. महामंडळ स्थापन्याच्या निर्णय झाल्यास त्यांच्या श्रमाची खर्‍या अर्थाने नोंद करता येणार आहे.
बहुतांश नाका कामगार,वीटभट्टी, ऊस तोडणी मजूर विदर्भ व मराठवाड्यातील असून उर्दहनिर्वाहासाठी मुंबई, ठाणे जिल्ह्यातील महानगरात आणि पश्‍चिम महाराष्ट्रात बिल्डर, व्यापारी व कारखानदारांकडे वर्षानुवर्षे राबत आहेत. बहुतांशजण बंजारा, दलित, अदिवासी,भटके विमुक्त जमातीतील आहे. ते वेगवेगळ्या जिल्ह्यातून शहरात येत असतात. त्यामुळे मुळ गावी आणि ज्या ठिकाणी मजूरी करतात त्याठिकाणी त्यांची सरकारी दप्तरी कसलीही नोंद नसल्यामुळे शासकीय योजना, सवलतीपासून वंचित आहे. त्याचप्रमाणे कामाच्या ठिकाणच्या व्यवस्थापनाकडून कोणतीच सुरक्षेची खबरदारी घेतलेली नसते. त्यामुळे अपघात,दुर्घटना घडल्यास मजुरांबरोबर कुटुंब उद्धवस्त होते. या कामगारांची रितसर नोंदणी करण्यात यावी, त्यांच्यासाठी माथाडी, विडी कामगारांप्रमाणे शासनाने सवलती देवून योजना राबवाव्यात, या मागणीसाठी बंजारा नाका कामगार संघटनेच्यावतीने गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने आंदोलन करुन शासनाचे लक्ष वेधण्यात येत होते. पाणी पुरवठा
व स्वच्छता मंत्री लक्ष्मण ढोबळे
यांनी कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे स्वतंत्र महामंडळासाठी बैठक बोलाविण्याची मागणी
केली होती.
नाका कामगार, दगडखाण, ऊस तोडणी आदी असंघटित श्रेत्रातील कामगारांच्या मागण्या प्रलंबित आहेत. त्यांची नोंदणी करुन सवलती देण्यासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन्याबाबत बैठकीत निर्णय घेतला जाईल, त्यासाठी आगामी अर्थसंकल्पात विशेष तरतूदीबाबत विचारविनिमय केले जाईल.
- हसन मुश्रीफ (कामगार मंत्री)

नाका कामगारांना हवे स्वतंत्र कामगार महामंडळ

नाका कामगारांना हवे स्वतंत्र कामगार महामंडळ

eSakal
Saturday, January 18, 2014 AT 09:25 PM (IST)
मुंबई -  राज्यातील बांधकाम आणि नाका कामगारांसाठी संत सेवालाल महाराज यांच्या नावाने स्वतंत्र कामगार महामंडळ स्थापन करा, राज्यातील सर्व नाका कामगारांची ते उभे राहत असलेल्या ठिकाणी नोंद करा, नाका कामगारांना रोजगार हमीचे संरक्षण द्या, आदी मागण्या बंजारा नाका कामगार संघटनेने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे केल्या आहेत.

मुख्यपान » मुंबई » बातम्या
 
0
 
0
 
- - सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 डिसेंबर 2014 - 12:15 AM IST



मुंबई - बंजारा नाका कामगार संघटनेतर्फे एक डिसेंबर ते एक जानेवारी 2014 या काळात सर्व क्षेत्रांतील कामगारांच्या हक्कांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राज्यव्यापी जनजागरण मोहीम हाती घेतली आहे. असंघटित कामगारांच्या मागण्या सरकारपुढे मांडण्यात येणार आहेत. 

राष्ट्रसंत सेवालाल महाराज यांच्या नावाने नाका व असंघटित कामगारांचे स्वतंत्र कामगार महामंडळ स्थापन करावे, एलआयसी; तसेच वैद्यकीय सुविधा पुरवणे, सरकारने मंजूर केलेले सिडको, म्हाडा, पीडब्ल्यूडी, एमएमआरडीए इत्यादी सरकारी संस्थांची कामे करणाऱ्यांना सरकारी कामगार घोषित करावे, त्यांना सरकारी कामगारांसारख्या सवलती द्याव्यात, त्यांची गणना व सर्व्हे करावा, त्यांच्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करावी आदी मागण्या सरकारकडे करण्यात येणार आहेत. एक टक्का उपकरातून जवळजवळ 2500 कोटींचा निधी पडून आहे. तो असंघटित कामगारांपर्यंत पोहोचलेला नाही. तो कामगारांना मिळावा, अशी मागणीही संघटना करणार आहे. 

बंजारा नाका कामगार संघटना या संदर्भात राज्यातील प्रत्येक शहरात पत्रके वाटत आहे. चौकसभा घेऊन कामगारांत जागृती करीत आहे. ही संघटना 11 वर्षांपासून दरवर्षी डिसेंबरमध्ये हा उपक्रम राबवते. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री व कामगारमंत्र्यांना निवेदन देण्यात येते.

http://jpnnews1.blogspot.in/2015/12/blog-post_25.html

JPN NEWS (NEWS PORTAL)
powered by
JPN NEWS (NEWS PORTAL)

09 December 2015

असंघटीत कामगांरासाठी संत सेवालाल महाराजांच्या नावे महामंडळ स्थापन करा

मुंबई, ठाण्यातील नाका कामगारांची सरकारकडे मागणी
राज्यातील असंघटीत आणि बांधकाम, नाका कामगारांच्या नोंदणीसाठी ९० दिवसांची अट पूर्ण करण्यासाठी कोणतेही बिल्डर्स आणि बांधकाम कंपन्या बांधकाम आणि नाका कामगारांना सहकार्य करत नाहीत, यामुळे मागील दोन वर्षांत मुंबई आणि परिसरातील रोज लाखांेच्या संख्येने नाका कामगार म्हणून काम करत असलेल्या कामगारांची सरकारदरबारी नोंद होेत नसून त्यामुळे राज्यात लाखोंच्या संख्येने असलेल्या नाका कामगारांना कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ मिळत नाही, यामुळे ही अट शिथिल करून ती ४० दिवसांची करावी आणि बांधकाम, नाका कामगारांसाठी राष्ट्रसंत सेवालाल महाराज यांच्या नावाने नाका व असंघटीत कामगारांचे स्वतंत्र कामगार महामंडळ स्थापन करावे या प्रमुख मागण्या मुंबईतील बांधकाम, नाका कामगारांकडून करण्यात येत आहेत. 

मागील दहा वर्षांपासून राज्यातील बांधकाम, नाका कामगारांमध्ये आपल्या हक्कांची जाणीव करून देण्यासाठी जनजागृती अभियान राबवणाऱ्या बंजारा नाका कामगार संघटनेकडून १ डिसेंबर ते ३ जानेवारी २०१६ या दरम्यान राज्यव्यापी जनजागृती अभियान राबवले जात आहे.  या अभियानाच्या माध्यमातून राज्यासह मुंबई, ठाणे, या परिसरातील असलेल्या सुमारे ३५० हून बांधकाम कामगारांच्या नाक्या-नाक्यांतवर जाऊन  कामगारांमध्ये जनजागृती अभियान राबवले जात असून मंगळवारी मानखूर्द पश्चिमेला असलेल्या बांधकाम कामगारांच्या नाक्यावर जनजागृती करण्यात आली. यावेळी बंजारा नाका कामगार संघटनेच्या प्रमुख प्रतिनिधींसोबतच महाराष्ट्र गाडिया लोहार घिसाडी महासंघाचे राष्ट्रीय संघटक मंगेश सोळंखे यांनी यावेळी नाका कामगारांना मार्गदर्शन  करून त्यांचे प्रश्न जाणून घेतले. 

यावेळी नाका कामगार हिराबाई राठोड, कमळबाई राठोड आदी ंनी राज्यातील असंघटीत नाका कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकारकडून तात्काळ राष्ट्रसंत सेवालाल महाराज यांच्या नावे असंघटीत कामगारांचे महामंडळ स्थापन करावे अशी मागणी केली. तर सीताबाई राठोड, सुशिलाबाई चव्हाण या मागील अनेक वर्षांपासून नाका कामगार म्हणून काम करत असताना आत्तापर्यंत सरकारकडून त्यांची नोंद करणे दूरच परंतु कोणत्याही योजनेचा लाभ आपल्याला मिळाला नसल्याची माहिती दिली. तर यावेळी मंगेश सोळंखे यांनी सरकारकडे असंघटीत कामगारांच्या सर्वांगिण विकासासाठी सुमारे तीन हजार कोटी रूपये जमा असतानाही अनेक प्रकारच्या नोंदणीसाठीच्या जाचक अटींमुळे नाका कामगार मोठ्या प्रमाणात सरकारी योजनांपासून उपेक्षित राहिले असल्याने याविरोधात सरकारला जाब विचारण्यासाठी बंजारा नाका कामगार संघटना, महाराष्ट्र गाडियालोहार  घिसाडी महासंघाच्या माध्यमातून हे राज्यव्यापी जनजागरण अभियान राबवले जात असल्याची माहिती नाका कामगारांना दिली. नाका कामगारांमध्ये जनजागृती करण्यासाठी मुंबई ठाणे आणि रायगड परिसरात असलेल्या  नाक्या-नाक्यांवर जाऊन त्यांच्यात जनजागृती केली जात असल्याची माहिती बंजारा नाका कामगार संघटनेचे प्रमुख ॲड. नरेश राठोड यांनी दिली.

http://archive.loksatta.com/

20 December 2015
http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=223940:2012-04-27-20-13-56&Itemid=1

नाका कामगारांचा आझाद मैदानात मेळावाBookmark and SharePrintE-mail
मुंबई आणि परिसर
http://archive.loksatta.com/
प्रतिनिधी, मुंबई 
नाका कामगारांनी आपल्या विविध मागण्यांसाठी कामगार दिनी म्हणजेच १ मे रोजी आझाद मैदानात भव्य मेळाव्याचे आयोजन केले आहे. नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पात असंघटित कामगारांच्या विकासासाठी कोणत्याही प्रकारच्या निधीची तरतूद केलेली नाही. याविरोधात सरकारला जागे करण्यासाठी आणि दगडखाण कामगारांमध्ये जनजागृती करण्यासाठी मुस्लिम भाईचारा कमिटीचे अध्यक्ष परवेज शेख, दिगंबर जाधव, रवी राठोड, शिवराम जाधव, बंजारा नाका कामगार संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. नरेश राठोड, यांच्या नेतृत्वाखाली राज्यव्यापी जनजागृती मेळाव्याचे आयोजन केले.
या मेळाव्यात एक अहवाल तयार करुन मुख्यमंत्र्यांना सादर केला जाणार आहे, असे बंजारा नाका कामगार संघटनेने पत्रकाद्वारे कळविले आहे. या मेळाव्यामुळे बंजारा नाका कामगारांच्या समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधले जाईल, अशी आशा या आयोजकांनी व्यक्त केली आहे.

http://archive.loksatta.com/

https://www.facebook.com/permalink.php?id=323383091040924&story_fbid=972869199425640


https://www.facebook.com/permalink.php?id=323383091040924&story_fbid=972869199425640

बंजारा नाका कामगार संघटनेच्या जनजागृती अभियानाला प्रतिसाद
मुंबई -प्रतिनिधी
देशातील तमाम भटकेविमुक्त, आदिवासी आणि ओबीसी समाजाचे नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी मुंबईतील नाका कामगारांकडून ठिकठिकाणी अभिवादन करण्यात आले. आपल्या समस्यांच्या मुख्य आधार असलेल्या आपल्या लाडक्या नेत्याला सकाळी नऊ वाजता त्यांचो छायाचित्र असलेल्या पत्रकाचे वाटप करून हे अभिवादन करण्यात आले. बंजारा नाका कामगार संघटनेकडून राज्यभरात सुरु करण्यात आलेल्या राज्यव्यापी जनजागृती अभियानांतर्गत फोर्ट परिसरात असलेल्या बजार गेटच्या पारसी मंदीर नाक्यावर सकाळी मुंडे यांना नाका, बांधकाम कामगारांकडून अभिवादन करण्यात आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष ॲड् नरेश राठोड, स्व.नारायणदादा आडे बहुउद्देशीय संस्था, शिळोणाचे प्रमुख व बंजारा नाका कामगार संघटनेचे प्रचारक प्रकाश आडे, संत सेवालाल फाऊंडेशनचे गोविंद राठोड, चंद्रा पवार, संतोष राठोड आदी उपस्थित होते.
गोपीनाथ मुंडे यांनी संत सेवालाल महाराज यांचे समाधीस्थळ असलेल्या वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी या तीर्थक्षेत्राचा विकास करण्याचे स्वप्न पाहिले होेते ते आता त्यांच्या सरकारने पूर्ण करावे आणि राज्यात असलेल्या असंघटीत क्षेत्रातील नाका व बांधकाम कामगारांच्या विकासासाठी राष्ट्रसंत संत सेवालाल महाराज यांच्या नावाने नाका व असंघटीत कामगारांचे स्वतंत्र कामगार महामंडळ स्थापन करावे ही प्रमुख मागणी संघटनेचे प्रमुख ॲड. राठोड यांनी केली.
संघटनेकडून मागील १ डिसेंबरपासून राज्यात जनजागृती अभियान राबवण्यात येत असून संघटनेचे प्रेरणास्थान असलेल्या गोपीनाथ मुंडे यांना फोर्ट परिसरातील फोर्ट नाका, चना स्ट्रीट नाका, वाशीनाका आदी अनेक ठिकाणी नाक्या-नाक्यांवर नाका कामगारांकडून अभिवादन करण्यात आले. फोर्ट नाका येथे प्रकाश आडे यांच्यासोबतच अर्जून जाधव, सुभाष आडे, भिमराव राठोड, भिका जाधव, भगवान ढोपावकर, समाधान कर्वेकर आदी उपस्थित होते. यावेळी संत सेवालाल महाराज आणि गोपीनाथ मुंडे यांच्या नावांचा जयघोष करण्यात आला.
***********************
बंजारा नाका कामगारांकडून बाजार गेट येथे असलेल्या फोर्ट नाक्यावर ओबीसीचे नेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले यावेळी संघटनेचे प्रमुख ॲड. नरेश राठोड, प्रकाश आडे आदी दिसत आहेत.
16 people like this.
Comments
Sanjeevkumar Kamble
Write a comment...

बंजारा नाका कामगार संघटनेचा

बंजारा नाका कामगार संघटनेचा राज्यव्यापी जनजागृती अभियान

dainik navshakti

मुंबई, दि. 13 (प्रतिनिधी) – राज्यातील नाका कामगारांसह सर्व असंघटित कामगारांच्या न्याय्य व हक्कांसाठी बंजारा नाका कामगार संघटनेचा राज्यव्यापी जनजागृती अभियान सुरू केले आहे. या अभियानाच्या माध्यमातून सर्व कामगारांच्या वस्तुस्थितीचा सविस्तर अहवाल मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह कामगारमंत्री आणि केंद्र सरकारकडे सादर करण्यात येणार आहे.
मुंबई आणि राज्यातील विविध शहर आणि परिसरात नाका कामगार, दगडखाण, विटभट्टी, बंजारा खडी कामगार, ऊसतोड कामगार, पॉवरलूम, मच्छीमार आदी क्षेत्रांत काम करणार्या कामागरांची संख्या सुमारे सव्वा कोटींच्या घरात आहेत. मात्र या कामगारांच्या प्रति सरकारकडून संवेदना बोथट झाल्याने त्यांच्याकडून राबविण्यात येत असलेल्या कोणत्याही योजना खर्या कामगारांपर्यंत पोहोचत नाहीत. योजनांसाठी अनेक प्रकारच्या जाचक अटी लावायच्या आणि त्यांचा पैसा इतर योजनांसाठी वापरायचा, असे धोरण गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. त्यामुळे या सरकारला जागे करण्यासाठी आणि राज्यातील सर्व असंघटित क्षेत्रात कार्यरत असलेल्या कामगारांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी बंजारा नाका कामगार संघटनेच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षांपासून दरकोस दर मुक्काम, राज्याव्यापी जनजागृती अभियान आणि कामगार हक्क मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
यंदा सरकारला जागे करण्यासाठी नाका कामगारांसह सर्व असंघटित कामगारांमध्ये जनजागृती करण्यासाठी बंजारा नाका कामगार संघटनेचे अध्यक्ष ऍड. नरेश राठोड यांच्या नेतृत्वाखाली राज्यव्यापी जनजागृती अभियानाचे आयोजन 1 डिसेंबर 2013 ते 1 जानेवारी 2014 या दरम्यान करण्यात आले होते. या अभियानाच्या माध्यातून राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये कार्यक्रम राबविण्यात आले. या माध्यमातून कामगारांना त्यांच्या हक्कांची जाणीव करण्यात आली. त्यात ऍड. नरेश राठोड, यांच्यासह कामगार संघटनेचे रामराव भाटेगावकर, मोहन राठोड, सागर तायडे, तोताराम जाधव, अजय केसराळीकर आदी नेत्यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला.
या राज्यव्यापी जनजागृती अभियानाचा समारोप क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि वीरमाता जिजाऊ यांच्या जयंती सप्ताहाच्या उत्सावाचे औचित्य साधून 3 जानेवारीला आझाद मैदानात आयोजित करण्यात आला होता. यावेळी बंजारा नाका कामगारांचे प्रमुख ऍड. नरेश राठोड व राज्यातील सर्व असंघटित कामगार संघटनेचे प्रमुख नेते उपस्थित होते.

असंघटित कामगांरासाठी महामंडळ स्थापन करा 

बंजारा नाका कामगार संघटनेचे राज्यव्यापी जनजागफती अभियान मंगळवारी मानखुर्द येथील नाक्यावर पोहोचले. त्यावेळी नाका कामगारांना मार्गदर्शन करून माहिती देताना महाराष्ट्र गाडियालोहार  घिसाडी महासंघाचे राष्ट्रीय संघटक मंगेश सोळंखे, हिरासिंग चव्हाण, ज्योतीराम चव्हाण  आदी.

मुंबई, ठाण्यातील नाका कामगारांची सरकारकडे मागणी
मुंबई / प्रतिनिधी
राज्यातील असंघटित आणि बांधकाम, नाका कामगारांच्या नोंदणीसाठी 90 दिवसांची अट पूर्ण करताना केणताही बिल्डर आणि बांधकाम कंपन्या कामगारांना सहकार्य करत नाहीत. यामुळे मागील दोन वर्षात मुंबई आणि परिसरातील रोज लाखेंच्या संख्येने नाका कामगार म्हणून काम करत असलेल्या कामगारांची सरकारदरबारी नोंद हेत नसून त्यामुळे राज्यात लाखोंच्या संख्येने असलेल्या नाका कामगारांना कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ मिळत नाही. यामुळे ही अट शिथिल करून ती 40 दिवसांची करावी आणि बांधकाम, नाका कामगारांसाठी राष्ट्रसंत सेवालाल महाराज यांच्या नावाने नाका आणि असंघटित कामगारांचे स्वतंत्र कामगार महामंडळ स्थापन करावे, अशी मागणी मुंबईतील बांधकाम, नाका कामगारांकडून करण्यात आली आहे.
मागील दहा वर्षापासून राज्यातील बांधकाम, नाका कामगारांमध्ये आपल्या हक्कांची जाणीव करून देण्यासाठी जनजागफती अभियान राबवणाऱया बंजारा नाका कामगार संघटनेकडून 1 डिसेंबर 2015 ते 3 जानेवारी 2016 या दरम्यान राज्यव्यापी जनजागफती अभियान राबवले जात आहे. या अभियानाच्या माध्यमातून राज्यासह मुंबई, ठाणे, या परिसरातील असलेल्या सुमारे 350 हून अधिक बांधकाम कामगारांच्या नाक्या-नाक्यांवर जाऊन कामगारांमध्ये जनजागफती अभियान राबवले जात आहे. मंगळवारी मानखूर्द पश्चिमेला असलेल्या बांधकाम कामगारांच्या नाक्यावर जनजागफती करण्यात आली. यावेळी बंजारा नाका
कामगार संघटनेच्या प्रमुख प्रतिनिधींसोबतच महाराष्ट्र गाडिया लोहार घिसाडी महासंघाचे राष्ट्रीय संघटक मंगेश सोळंखे यांनी यावेळी नाका कामगारांना मार्गदर्शन  करून त्यांचे प्रश्न जाणून घेतले. यावेळी नाका कामगार हिराबाई राठोड, कमळबाई राठोड आदींनी राज्यातील असंघटीत नाका कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकारकडून तात्काळ राष्ट्रसंत सेवालाल महाराज यांच्या नावे असंघटीत कामगारांचे महामंडळ स्थापन करावे अशी मागणी केली. तर सीताबाई राठोड, सुशिलाबाई चव्हाण या मागील अनेक वर्षांपासून नाका कामगार म्हणून काम करत असताना आत्तापर्यंत सरकारकडून त्यांची नोंद करणे दूरच परंतु कोणत्याही योजनेचा लाभ आपल्याला मिळाला नसल्याची माहिती दिली. तर यावेळी मंगेश सोळंखे यांनी सरकारकडे असंघटीत कामगारांच्या सर्वांगिण विकासासाठी सुमारे तीन हजार कोटी रूपये जमा असतानाही अनेक प्रकारच्या नोंदणीसाठीच्या जाचक अटींमुळे नाका कामगार मोठय़ा प्रमाणात सरकारी योजनांपासून उपेक्षित राहिले असल्याने याविरोधात सरकारला जाब विचारण्यासाठी बंजारा नाका कामगार संघटना, महाराष्ट्र गाडियालोहार  घिसाडी महासंघाच्या माध्यमातून हे राज्यव्यापी जनजागरण अभियान राबवले जात असल्याची माहिती नाका कामगारांना दिली. नाका कामगारांमध्ये जनजागफती करण्यासाठी मुंबई ठाणे आणि रायगड परिसरात असलेल्या  नाक्या-नाक्यांवर जाऊन त्यांच्यात जनजागफती केली जात असल्याची माहिती बंजारा नाका कामगार संघटनेचे प्रमुख ऍड. नरेश राठोड यांनी दिली.