शनिवार, १९ डिसेंबर, २०१५

"पोहरादेवी (पोहरागड)" पर्यटन

http://epaper.eprahaar.in/detail.php?cords=242,1586,1234,2248&id=story10&pageno=http://epaper.eprahaar.in/28112015/Mumbai/Page5.jpg


आमदार रामनाथ मोते यांची शासनाकडे मागणी 
मुंबई (प्रतिनिधी)

 देशातील सुमारे ७ कोटीच्या दरम्यान असलेल्या भटक्या विमुक्त जाती जमातीचे सर्वात मोठे श्रद्धास्थान व पवित्र तीर्थक्षेत्र असलेल्या पोहरादेवी (पोहरागड) पर्यटन स्थळ म्हणून घोषित करण्याची मागणी शिक्षक आमदार रामनाथ मोते यांनी शासनाकडे केली असल्याचे शिक्षक परिषदेचे अनिल बोरनारे यांनी सांगितले.
याबाबत आमदार रामनाथ मोते यांनी मंत्रालयात राज्यमंत्री व वाशीम जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ रणजीत पाटील यांना भेटून हि मागणी केली आहे.
वाशीम जिल्ह्याच्या मानोरा तालुक्यातील पोहरागड येथे रामनवमीच्या दिवशी फार मोठा उत्सव साजरा होतो तसेच राष्ट्रसंत सेवालाल महाराज यांच्या प्रसिद्ध समाधी स्थळाच्या दर्शनासाठी दरवर्षी 15 ते 20 लाख भक्तगण व पर्यटक येत असतात. पोहरागड  हे निसर्गाने सुशोभित असे तीर्थक्षेत्र असून या स्थळाचा पर्यटन म्हणून विकास होणे आवश्यक आहे.

या तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी यापूर्वीच्या शासनाने अनेकवेळा घोषणा करूनही कोणत्याही प्रकारची अंमलबजावणी केली नाही. या ठिकाणी आंध्रप्रदेश, कर्नाटक, मध्यप्रदेश, गोवा आदी राज्यातून येणार्या भक्तगणासाठी परिवहन, पाणी, भक्तनिवास, पथदिवे इत्यादीबाबत तातडीने कृती कार्यक्रम घेणे आवश्यक आहे.
दिवंगत लोकनेते गोपीनाथजी मुंडे यांचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी तातडीने मंत्रालयात बैठक आयोजित करावी अशी मागणी आमदार रामनाथ मोते यांनी शासनाकडे केली असल्याचे शिक्षक परिषदेचे अनिल बोरनारे यांनी सांगितले. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा