शनिवार, १९ डिसेंबर, २०१५

मुख्यपान » मुंबई » बातम्या
 
0
 
0
 
- - सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 डिसेंबर 2014 - 12:15 AM IST



मुंबई - बंजारा नाका कामगार संघटनेतर्फे एक डिसेंबर ते एक जानेवारी 2014 या काळात सर्व क्षेत्रांतील कामगारांच्या हक्कांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राज्यव्यापी जनजागरण मोहीम हाती घेतली आहे. असंघटित कामगारांच्या मागण्या सरकारपुढे मांडण्यात येणार आहेत. 

राष्ट्रसंत सेवालाल महाराज यांच्या नावाने नाका व असंघटित कामगारांचे स्वतंत्र कामगार महामंडळ स्थापन करावे, एलआयसी; तसेच वैद्यकीय सुविधा पुरवणे, सरकारने मंजूर केलेले सिडको, म्हाडा, पीडब्ल्यूडी, एमएमआरडीए इत्यादी सरकारी संस्थांची कामे करणाऱ्यांना सरकारी कामगार घोषित करावे, त्यांना सरकारी कामगारांसारख्या सवलती द्याव्यात, त्यांची गणना व सर्व्हे करावा, त्यांच्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करावी आदी मागण्या सरकारकडे करण्यात येणार आहेत. एक टक्का उपकरातून जवळजवळ 2500 कोटींचा निधी पडून आहे. तो असंघटित कामगारांपर्यंत पोहोचलेला नाही. तो कामगारांना मिळावा, अशी मागणीही संघटना करणार आहे. 

बंजारा नाका कामगार संघटना या संदर्भात राज्यातील प्रत्येक शहरात पत्रके वाटत आहे. चौकसभा घेऊन कामगारांत जागृती करीत आहे. ही संघटना 11 वर्षांपासून दरवर्षी डिसेंबरमध्ये हा उपक्रम राबवते. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री व कामगारमंत्र्यांना निवेदन देण्यात येते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा