शनिवार, १९ डिसेंबर, २०१५

बंजारा नाका कामगार संघटनेचा

बंजारा नाका कामगार संघटनेचा राज्यव्यापी जनजागृती अभियान

dainik navshakti

मुंबई, दि. 13 (प्रतिनिधी) – राज्यातील नाका कामगारांसह सर्व असंघटित कामगारांच्या न्याय्य व हक्कांसाठी बंजारा नाका कामगार संघटनेचा राज्यव्यापी जनजागृती अभियान सुरू केले आहे. या अभियानाच्या माध्यमातून सर्व कामगारांच्या वस्तुस्थितीचा सविस्तर अहवाल मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह कामगारमंत्री आणि केंद्र सरकारकडे सादर करण्यात येणार आहे.
मुंबई आणि राज्यातील विविध शहर आणि परिसरात नाका कामगार, दगडखाण, विटभट्टी, बंजारा खडी कामगार, ऊसतोड कामगार, पॉवरलूम, मच्छीमार आदी क्षेत्रांत काम करणार्या कामागरांची संख्या सुमारे सव्वा कोटींच्या घरात आहेत. मात्र या कामगारांच्या प्रति सरकारकडून संवेदना बोथट झाल्याने त्यांच्याकडून राबविण्यात येत असलेल्या कोणत्याही योजना खर्या कामगारांपर्यंत पोहोचत नाहीत. योजनांसाठी अनेक प्रकारच्या जाचक अटी लावायच्या आणि त्यांचा पैसा इतर योजनांसाठी वापरायचा, असे धोरण गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. त्यामुळे या सरकारला जागे करण्यासाठी आणि राज्यातील सर्व असंघटित क्षेत्रात कार्यरत असलेल्या कामगारांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी बंजारा नाका कामगार संघटनेच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षांपासून दरकोस दर मुक्काम, राज्याव्यापी जनजागृती अभियान आणि कामगार हक्क मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
यंदा सरकारला जागे करण्यासाठी नाका कामगारांसह सर्व असंघटित कामगारांमध्ये जनजागृती करण्यासाठी बंजारा नाका कामगार संघटनेचे अध्यक्ष ऍड. नरेश राठोड यांच्या नेतृत्वाखाली राज्यव्यापी जनजागृती अभियानाचे आयोजन 1 डिसेंबर 2013 ते 1 जानेवारी 2014 या दरम्यान करण्यात आले होते. या अभियानाच्या माध्यातून राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये कार्यक्रम राबविण्यात आले. या माध्यमातून कामगारांना त्यांच्या हक्कांची जाणीव करण्यात आली. त्यात ऍड. नरेश राठोड, यांच्यासह कामगार संघटनेचे रामराव भाटेगावकर, मोहन राठोड, सागर तायडे, तोताराम जाधव, अजय केसराळीकर आदी नेत्यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला.
या राज्यव्यापी जनजागृती अभियानाचा समारोप क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि वीरमाता जिजाऊ यांच्या जयंती सप्ताहाच्या उत्सावाचे औचित्य साधून 3 जानेवारीला आझाद मैदानात आयोजित करण्यात आला होता. यावेळी बंजारा नाका कामगारांचे प्रमुख ऍड. नरेश राठोड व राज्यातील सर्व असंघटित कामगार संघटनेचे प्रमुख नेते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा